महिला शिवसैनिकांनी पक्ष संघटन मजबूतीसाठी प्रयत्न करावे:शिल्पा बोडखे यांचे आवाहन


वरोरा : आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम पक्षसंघटन मजबूत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी महिला शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन असे शिवसेनेच्या पूर्व विदर्भ महिला संपर्कप्रमुख शिल्पा बोडके यांनी केले. वरोरा येथे आयोजित शिवसेनेच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. शिवसेना महिला आघाडी तालुका वरोराच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा परिचय आणि सुसवांद ही आढावा सभा गुरुवार दि ६ जानेवारी रोजी वरोरा येथे पार पडली.या आढावा सभेला प्रमुख अतिथी म्हणून पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता शिवसेना शिल्पा बोडखे उपस्थित होत्या.यावेळी
शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी व महिला संघटिका पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पूर्व विदर्भ महिला संघटिका शिल्पा बोडखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना शिल्पा बोडखे म्हणाल्या की, महिलांनी जास्तीतजास्त संख्येने राजकारनात सक्रिय झालं पाहिजे. तसेच येणाऱ्या निवडूनकांमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आल्या पाहिजे व शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेना नेहमीच कटीबद्ध असते असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांनी याप्रसंगी केले.सदर कार्यक्रमात महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला वंदन केले. तसेच अनाथाची माय समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम, युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर हर्षल शिंदे,शिवसेना तालुका प्रमुख नागभीड शिवसेना युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर तथा शिवसेना तालुका संघटक वरोरा मनिष जेठानी , शिवसेना तालुका प्रमुख ब्रम्हपुरी नरेंद्र नरड, शिवसेना तालुका प्रमुख चिमूर बालू सातपुते, शिवसेना तालुका प्रमुख नागभीड भोजराज ज्ञानबोनवर,शिवसेना उपजिल्हा महिला संघटिका माया नारळे, शिवसेना उपजिल्हा सनम्व्यक कीर्ती पांडे,शिवसेना महिला तालुका संघटिका सिंदेवाही कविता कुंटावार, शिवसेना उपतालुका संघटिका नागभीड चंद्रकीर्ती गेडाम, शिवसेना नगरसेवक वरोरा प्रणाली मेश्राम, शिवसेना नगरसेवक सुष्मा भोयर, शिवसेना माजी नगराधक्ष भद्रावती मीनल आत्राम, शिवसेना सरपंच माधुरी घागी, शिवसेना उपसरपंच साधना मानकर, शिवसेना उपतालुका संघटिका रजनी मेश्राम, उपशहर संघटिका अल्का पचारे, शहर संघटिका माया टेकाम, मनीषा मत्ते, विजुमाला जिवतोडे, बालाजी जिवतोडे सरपंच, नर्मदा पेंदोर,मीना मोहुर्ले सावली,शिवसेना नगरसेवक दिनेश यादव, शिवसेना नगरसेवक तथा शहर प्रमुख भद्रावती नंदू पढाल, शिवसेना उपतालुका प्रमुख भद्रावती बाळा क्षीरसागर, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख गणेश चिडे, शिवसेना उपशहर प्रमुख मनिष दोहतरे,आलेख रठे, महेश जिवतोडे, घनश्याम अस्वले, शुभम टोरे, गणेश जानवे , अमित निब्रड, अतुल नांदे, मनिष ठक, येशु आर्गी, सोनू पित्तलवार, मनिष साखरकर, सोहेल शेख, वरोरा,भद्रावती, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, सावली, नागभीड, चिमूर तालुक्यातील विद्यमान महिला आघाडी आणि आजी माजी पदाधिकारी, महिला संघटिका युवासैनिक उपस्थित होते.उपस्थितांचे आभार शिवसेनेच्या सिंदेवाही तालुका महिला संघटिका कविता कुंटावार यांनी मानले.