न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे कोरोना लसीकरण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे कोरोना लसीकरण येथे दि 7 जानेवारी रोजी कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 15 ते 18 वर्ष वयोगटातील कनिष्ठ महाविद्यालय मधील 116 विध्यार्थी तर हायस्कूल मधील 458 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले .”जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा” अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी श्री पाटील सर आणि नीलिमा चौधरी मॅडम, मंगला दुगधिकर यांनी कोविड लसीकरण आणि आजार या संदर्भात इत्यंभूत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कोविड आजाराबाबत विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली तसेच आरोग्यसेविका चौधरी मॅडम व तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मोहन देशमुख, उपमुख्याध्यापक प्रा. जितेंद्रभाऊ जवादे, पर्यवेक्षक विजय कचरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव अर्चनाताई धर्मे ह्या वेळी उपस्थित होते…सदर लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.