
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव नगर पंचायत निवडणुकिचा निकाल लागला असून यामध्ये प्रभाग क्रमांक १५ हा प्रभाग अनुसूचित जमाती महिला करिता राखीव होता, या प्रभागामध्ये एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामधून अपक्ष उमेदवार सौ. पुष्पा विजय किन्नाके यांचा विजय झाला.
हा विजय या प्रभागात कार्यरत असलेल्या आदर्श मंडळाचा विजय आहे. हे मंडळ नेहमीच सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहत असल्याने या प्रभागातील मतदारांनी आदर्श मंडळाच्या कार्याची पावती म्हणूनच सौ. पुष्पा विजय किन्नाके यांना विजयी केले. या विजयामध्ये आदर्श मंडळाचे संस्थापक तथा राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी यांची भुमिका महत्वपूर्ण ठरली हे विशेष.
या विजयाकरिता आदर्श मंडळाचे शशीमोहन लढी, ज्ञानेश्वर गिरी, मनोज भोयर, गजू गिरी,संदीप झाडे, संदीप बेडदेवार, अमोल पंडीत, उमेश कोसुळकार, समीर लाखाणी, दिनेश झाडे, संतोष धांदे, पांडुरंग धोटे, विजय भोयर, संजय राऊत, प्रकाश भावे, बंडू थुटूरकर, बाळकृष्ण लोंढे, अमित भोंगाडे, नरेश आमटे, गणेश ठाकरे, शंकर नागोसे, रितेश चिटमलवार, आकाश धनालकोटवार, करण धनालकोटवार,अमीन शेख, स्वप्नील नागोसे, गजानन किन्नाके, वैभव बोभाटे, अनुप नागोसे, गौरव किन्नाके, महेश परचाके, शालूताई नागोसे, छायाताई गवळी, अनुश्री चव्हाण, शांताताई किन्नाके, सविताताई किन्नाके आणि मंडळाचे वयाने लहान असलेले चिमुकले साहिल लाखाणी, राज झाडे, श्रीकांत शिखरे, ओम बेडदेवार, शाम झाडे, साईराम यनगृतवार, ओम कोसुळकार, ऋषिकेश किन्नाके यांनी प्रत्यक्ष निवडणुक प्रचारात सहभाग घेऊन अथक परिश्रम घेतले.
