
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा अंतर्गत जनतेच्या मनात स्वातंत्र्य स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने १३ ते १५ ऑगष्ट या कालावधीमध्ये देशभरात घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने राळेगांव पंचायत समितीत दि १२ ऑगष्ट २०२२ रोज शुक्रवारला गटविकास अधिकारी केशव पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या नेतृत्वात हर घर तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली.
ही घर घर तिरंगा सायकल रॅली पंचायत समिती मधून काढण्यात आली असून ही रॅली ते रावेरी येथे जावून शहरातून काढण्यात आली असून रॅलीचा समारोप पंचायत समितीत करण्यात आला असून या रॅलीत पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
