
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
यवतमाळकडून परत येत असताना कारच्या भीषण अपघातात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वर्धा यवतमाळ मार्गावर सेलसुरा येथील मदाडी नदीच्या पुलाच्या परिसरात सोमवारी २४ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. जवळपास ३० ते ४० फूट अंतरावरून कार खाली पडली. अनियंत्रित कार नदी पुलाच्या संरक्षक भिंतीला धडकून नदीत आदळून हा अपघात घडला.
अपघाती मृत्यू झालेले सातही विद्यार्थी सावंगी (मेघे) येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. सातही विद्यार्थी ओडी २३ बी १११७ क्रमांकाच्या कारने यवतमाळकडून वर्ध्याकडे परत येत होते. दरम्यान, सेलसुराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या संरक्षित भिंतीला लागून नदीपात्राच्या कोरड्या भागात आदळली. त्यामध्ये सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. भीषण अपघातात सातही
घटना दुर्दैवी अभ्युदय मेघे
सातपैकी एका विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. तो साजरा करायला गेले होते. होस्टल प्रशासनाला लवकर येत असल्याचे सांगून ते बाहेर गेले होते. रात्री या घटनेची माहिती मिळाली ही दुर्दैवी घटना आहे. यातील एक विद्यार्थी इंटर्नशिप करीत होता. पुढील काळजीच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगितले.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्तः
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत शोक व्यक्त केला. घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले.
