राळेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रा.प. येथे आशा वर्कर सेविका यांच्या हस्ते ध्वजारोहण

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील ग्रामपंचायत मध्ये विधवा महिला आशा वर्कर श्रीमती वैशाली चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील सरपंच उमेश दा. गौऊळकार यांनी एक आपल्या गावासाठी वेगळा उपक्रम राबविल्याने सध्या त्यांची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे. १५ ऑगस्ट रोजी म्हणजे गणराज्य दीनी ध्वजारोहण माजी सैनिक प्रशांत मो.चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला होता तर आता २६ जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी विधवा महिला श्रीमती वैशाली चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला आहे. सतत दोन वर्षे कोरोना योध्दा म्हणून काम करत असलेल्या श्रीमती वैशाली चौधरी यांचा रिधोरा गावचे प्रथम नागरिक सरपंच उमेश दा. गौऊळकार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर अंगणवाडी सेविका सौ.मीराबाई पंढरीनाथ करपते, श्रीमती प्रतिभा श्रीराम राऊत अंगणवाडी सेविका यांचा ही कोरोना योध्दा म्हणून सरपंच यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच उमेश दामोधरजी गौऊळकार, उपसरपंच सौ.टीणुताई नितेश ठेंगणे, पोलीस पाटील ढगेश्वर मांदाडे व ग्रामपंचायत सदस्य सौ.वृशाली विलास पवार, अरविंद अशोक गाऊत्रे,सौ.मनिषा राजु गुरनुले, सौ.सुलोचना हनुमान कुडमते,सौ.वैशाली संजय गुरनुले व सचिव सौ.वीणा राऊत, तलाठी दुर्गेश बावनकुळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुकदेवे सर ,शिक्षक शिरभाते सर ,आरोग्य सेविका कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी राजु पंडिले,विलास पवार, राजु गुरनुले, भास्कर तोडासे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.