
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
२६ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव येथे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावर्षी ध्वजारोहन कार्यक्रमासाठी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेले व सतत १७ वर्षांपासून कार्यरत असणारे TDRF च्या राळेगाव कंपनीतील TDRF जवानांना राळेगाव तहसीलदार यांच्या कडून शासकीय स्तरावरून ध्वजवंदनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ध्वजारोहण होताच राळेगाव कंपनीच्या TDRF जवानांकडून व पोलिसाकडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. Covid-19 महामारी मध्ये TDRF कडून विविध प्रकारे सेवाकार्य व मदत कार्य करण्यात आले आहे. हे सर्व कार्य TDRF जवानांनी निशुल्क केले आहे. त्याच्या या सेवेची दखल घेत जवानांना तहसीलदार वणी यांच्या हस्ते कोव्हिड योद्धा म्हणून सेवाकार्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सोबतच TDRF ने विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती मध्ये बचावकार्य केले आहे. सर्व शासकीय स्तरावरील अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी युवक-युवती यांना TDRF द्वारा आपत्ती व्यवस्थापन व इतर विषयाचे प्रशिक्षण दिले जाते.
. ध्वारोहण कार्यक्रमा प्रसंगी तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ.रविंद्र कानडजे, TDRF चे ट्रूप कमांडर म्हणून राळेगाव कंपनीचे अनिकेत वनस्कर होते, सोबत संजना राउत,पायल येवले, स्वप्नील येवले,आचल चहारे, शिल्पा सोयाम, पंकज चंदनावत,पायल चंदनावत, आर्यन खिरकर, दिपाली अत्राम इ. TDRF आधिकारी व जवान उपस्थित होते.
