
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जायचा रस्ता अडवल्याच्या निषेधार्थ सुरु असलेले उपोषण अखेर आज सुटले. यात उपोषणकर्त्या महिलेच्या कुटुंबियानी मार्ग अडवण्यात आल्याने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय देखील घेतला होता. पण त्यात कुटुंबीयांनी प्रसंगाधान राखल्याने अनर्थ टळला.
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दिनांक 22 ऑक्टोंबर पासून चालू असलेल्या उपोषणाची आज दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी राळेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार अशोकरावजी उईके यांच्या हाताने हे उपोषण सोडण्यात आले. यात ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच सचिव व विस्तार अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देऊन उपोषण सोडण्यास सांगितले. तुमचा रस्ता मोकळा केला जाईल अशा प्रकारचे या पत्रामध्ये नमूद केले आहे.
