
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र चालुच असताना आज पुन्हा एका 22 वर्षीय युवकाने शेतातीलच विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना टाकळी (कुंभा) येथे आज 7 फेब्रुवारी च्या दुपारी 1.30 वाजताचे दरम्यान उघडीस आली.राहुल सुरेश ठोंबरे असे मृतकाचे नाव आहे.माहिती नुसार मृतक राहुल ठोंबरे (22) हा सकाळी शेतात गेला असता घरी आला नसल्याने मृतकाचे कुटूंबियांनी राहुल ची इकडे तिकडे शोधा शोध घेतली.दरम्यान दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान घरच्या शेतातील विहिरीत मृतक राहुल चा मृत्यूदेह पाण्यात तरंगत आढळला राहुल च्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.मृतकाचे कुटूंबात आई,वडील,मोठा भाऊ मोठा आप्तपरिवार आहे.
