विद्यापीठानी पिकांचे नवनवीन वाण शोधावे :- माणिकरावजी ठाकरे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

शेती व्यवसायात सध्या जबरदस्त स्पर्धा आहे शेतकऱ्यांना या स्पर्धेत टिकायचे असल्यास शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिकतेची कास धरावी तसेच कृषी विद्यापीठ सुद्धा निरंतर संशोधन करीत पिकांचे नवनवीन वाण शोधावे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असे आवाहन माणिकरावजी ठाकरे यांनी राळेगाव येथे केले बाजारसमिती सभापती ऍड प्रफुल्लभाऊ मानकर यांचे वाढदिवसानिमित्त बाजार समिती मध्ये शेतकरी प्रशिक्षण तूर व सोयाबीन पिकांविषयी मार्गदर्शन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ठाकरे बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण मंत्री प्रा वसंतरावजी पुरके प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक विलासबाबु भोयर व्ही सी एम एस चे संचालक अरविंदभाऊ वाढोनकर, वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार जी गांधी,खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंदभाऊ इंगोले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका वर्षाताई तेलंगे तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ सतीश नीचळ,डॉ एकनाथ वैद्य,डॉ प्रवीण पाटील आदी उपस्थित होते ।।।यावेळी विविध संस्थांतर्फे ऍड प्रफुल्लभाऊ मानकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच सोयाबीन पिकाविषयी डॉ सतीश निचळ यांनी तर तूर पिकाविषयी डॉ एकनाथ वैद्य यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली यावेळी प्रा वसंतभाऊ पुरके यांनी प्रफुल्ल भाऊंचे नेतृत्वाचे कसब मान्य करीत नगरपंचायतीच्या निवडणुकीतील यशाचे श्रेय भाऊला दिले तसेच पक्षवढीसाठी भविष्यात एकदिलाने काम करू असेही सांगितले तसेच सदासर्वकाळ शेतकरी प्रश्नावर शेतीवर बोलणारा भाऊ हेच जिल्ह्यात एकमेव नेते असल्याचे सांगितले प्रफुल्ल भाऊंनी सतकारबद्दल सर्वांचे आभार मानून शेतकरी हाच आपला कायम विषय राहील असे सांगितले तसेच काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण कायम प्रयत्नरत राहु असे सांगितले यावेळी तालुक्यातील शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये उमेश झाडे,संदीप हांडे,निश्चल बोभाटे, हरीश काळे ,अभिषेक इंगोले,चंद्रभान उगेमुगे, निशिकांत रोहनकर यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश काळे यांनी प्रास्ताविक अरविंदभाऊ वाढोनकर यांनी तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे संचालक राजेंद्रभाऊ तेलंगे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समितीचे संचालक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.