“गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात” चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.

चंद्रपूर च्या कुशीत अनेक कलाकारांची प्रतिभा प्रतिभा दडली आहे. अशाच प्रतिभावंत कलाकारांनी संधीचे सोने करून झिरा फिल्म प्रोडक्शन निर्मित “गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात” या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. तसेच 11 फेब्रुवारी 2022 रोजी कार्निवल सिनेमा सिव्हिल लाईन येथे दर्जेदाररित्या चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.

या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून गणेश पायघन यानी अप्रतिम काम करून प्रेक्षकांवर छाप सोडलेली दिसत आहे आणि या चित्रपटात छोटा अभिनय देखील साकारला आहे. अंगी बालपणापासूनच असलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करून अभिनय तसेच दिग्दर्शन करण्याचे ठाणले आणि यातूनच सुरू झाला तो दिग्दर्शनाच्या वाटेवर चा खडतर प्रवास. मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये गणेशने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.या प्रवासादरम्यान खरी साथ मिळाली शुभम रे या कलाकाराची. मुख्यता चित्रपटाचे दिग्दर्शन शुभम रे यानीच केले आहे. अनेक मराठी मालिकांमधून तसेच चित्रपटातून यानी आपले नाव कमावले आहे. या चित्रपटात चंद्रपूर रहिवासी वसुधा गाऊत्रे हिने असिस्टंट कोरिओग्राफर तसेच बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे.

योग्य वाट मिळाल्यास नक्कीच संधीचे सोने करू, अशी माहिती या कलाकारांनी लोकहीत महाराष्ट्रला दिली आहे.