
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
भटाळी वेकोली खाण अंतर्गत जि . आर.एन कंपनी द्वारे कामगारांव केल्या जात असलेल्या अन्याय विरोधात म.न.से नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आज कामगारांनी जि.आर.एन कंपनीच्या व्यस्थापकाला जाब विचारला.येत्या दोन दिवसात कामगारांना न्याय न दिल्यास म.न.से स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला . भटाळी वेकोलित खासगी कंपनी जि .आर. एन कंपनीच्या माध्यमातून काम केले जात आहे.जि. आर.एन कामगारांना संपूर्ण ३० दिवसाचे काम न देता २६ दिवसाचे काम दिले जाते. यामुळे कामगारांना वेतन कमी मिळत आहे. कामगारांचेहेल्थ इन्शुरन्स काढण्यात आले नाही. यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास कामगार व त्यांचे कुटुंबीय नुकसान भरपाईपासून वंचित राहतील कामगारांना त्यांचा हक्काचा बोनस कंपनी देत नाही.कामगारांना बोनस पासून वंचित ठेवले जात आहे.जि. आर.एन कंपनीचे वाहन नादुरुस्त असल्याने वाहन चालविणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.कंपनी द्वारे अंबुलन्स उपलब्ध नसल्याने अपघातात जखमी कामगाराला दवाखान्यात नेताना अडचण जाते.कंपनी कडून स्थानिक कामगाराकडून कंपनी द्वारे मेस चा लाभ न घेता पैसे कपात केले जात आहे कंपनी कडून कामगारांना नित्कृष्ट दर्जाचा नाश्ता दिला जातो . अशाप्रकारे जि.आर.एन कंपनी कामगारांचे शोषण करीत असताना वेकोली भटाळी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.जि. आर.एन कंपनीने कामगारांच्या समस्या येत्या दोन दिवसात सोडवावा अन्यथा म.न.से आपल्या स्टाईल ने तीव्र आंदोलन छेडणार व याची सर्व जबाबदारी वेकोली प्रशासनाची राहील असा इशाग म.न.से नेते मनदीप रोडे यांनी जि.आर.एन कंपनीच्या व्यवस्थापकाला दिला आहे.यावेळी मनसे पदाधिकारी म.न.से तुकुम शाखा अध्यक्ष सौ.संगीता धात्रक, शहर सचिव सुमित करपे, संदीप अरडे, नितीन बावणे, मुकेश बावणे, आशिष शेंडे, रवी पवार, प्रेमचंद सोनकर, मारोती बोबडे, अनमोल साओ, सुरेंद्र साओ, खामत व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते .
