
मुकुटबंन परिसरातील मोठं गाव असलेलं गाव म्हणून ज्याची ख्याती आहे ते अडेगाव परिवर्तनासाठी नावाजलेल गाव. तिथे पाहावे वाचावे, ऐकावे ते नवलच असणार. अशीच एक नवलाची गोष्ट या गावात घडली.
अनेक वर्षांनंतर जुनी पध्दत नव्याने आणून चक्क बैलगाडी वरच नवरदेव बसून मंगेश जगन्नाथ झाडे यांची वरात काढली. आणि सर्वत्र बघण्यास बघ्यांची गर्दी जमली होती.
या आगळ्या वेगळ्या पध्दतीला सर्वानी दाद दिली. बैलगाडी हे शेतकऱ्यांचे महत्वाचे वाहन आहे. हे परिसरातील लोकांना आपलेसे वाटले आणि अनेक वर्षाने हे चित्र पाहताना आपुलकी ची भावना जागृत झाली.
