पांढरकवडा येथे हैदराबाद येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ न्यायाच्या मागणीसाठी निवेदन सादर

.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

शीख समाज पांढरकवडा तालुकाच्या वतीने निषेध रॅली काढून, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांचेमार्फत तेलंगाना मुख्यमंत्री कडे पाठवले निवेदन.

आज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ला तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरांमध्ये रंगारेड्डी सुभाषनगर येथे शिख समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेला बरेच दिवस उलटून सुद्धा तेलंगणा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही योग्य कारवाई करण्यात आली नाही. म्हणूनच हैदराबाद पोलिस प्रशासनाच्या मंद कारभारामुळे आतापर्यंत अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला नाही, परिणामी समाजात भीतीदायक वातावरण निर्माण झाले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने तसेच शीख समाजातील मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पांढरकवडा तालुका शिख समाजामार्फत आज दिनांक 21 फेब्रुवारी 2022 ला पांढरकवडा येथील मुख्य बाजारपेठेतून शीख समाज बांधवांनी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या निषेध रॅलीमध्ये पांढरकवडा तालुक्यातील शीख समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता हैदराबाद घटनेतील पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच हैदराबाद घटनेतील आरोपीचा शोध घेऊन नराधमांना न्यायालयापुढे हजर करून कायदेशीर कठोर कारवाई करून पीडित शीख समाजातील मुलीला न्याय द्यावा व सदर घटनेत तेलंगणा मुख्यमंत्र्यांनी व महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे या मागणीचे निवेदन पांढरकवडा उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री तेलंगणा राज्य यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. सदरच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे सुद्धा पाठविण्यात आली आहे निषेध रॅली व निवेदन सादर करतेवेळी पांढरकवडा तालुका शीख समाज बांधव हरपालसिंग चोपडा, जगदीपसिंह काळे, जसविंदरसिंग सोगी , बिशनसिंग सिंधो, जितेंद्रसिंग कोंघारेकर, राजेंद्रसिंग जुनी, रूपसिंह चहाल, गजेंद्रसिंग काळे ,भारतसिंग गोरमनगर तसेच अनेक प्रतिष्ठित समाजबांधव या वेळी उपस्थित होता.