
( रेती तस्कराच्या खड्ड्यांमुळे युवकांच्या बळी )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
रामतीर्थ येथे पेंटिंग चे कामा करीता गेलेल्या आतेभाऊ मामेभावा चा कापशी येथील वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल (दि. 25 ) घडली. सूरज जगदीश खंदार (15) आदित्य राजू गायकवाड (18 ) असे मृतकाचे नाव आहे.
रामतीर्थ येथे पेंटिंग चे कामा करीता सूरज व आदित्य सूरज च्या वडिलांसोबत गेलें होते. शुक्रवार बाजार असल्याने दुपारी वडील राळेगाव ला गेलें. दरम्यान हे मामे भाचे कामं आटोपून नदीवर गेलें. या ठिकाणी जेसीबी द्वारे अवैद्य रेती तस्करांच्या मोठं मोठे खड्डयाचा अंदाज न आल्याने सूरज व आदित्य यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.
आदित्य गायकवाड हा देवळी येथे राहत होता. तर सूरज खंदार नागठाणा येथील रहिवासी आहे. कष्ट करून उदरनिर्वाह करणारे हे सामान्य कुटुंबातील मूल रेती तस्कराच्या खड्ड्यांमुळे युवकांच्या बळी ठरल्याची प्रतिक्रिया तालुक्यात वेक्त होतं आहे व अधिक तपास राळेगाव पोलीस स्टेशन चे संजय चौबे करीत आहेत.
