
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न भूतो न भविष्य असा घडवून आणलेला कार्यक्रम “‘ रावेरी महाशिवरात्री महोत्सव “‘ आयोजक मा नंदु पाटील राऊत, विश्वकर्मा बिझनेस गृप राळेगाव उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट गायक कलाकार सारे गामा चा उपविजेता, उज्ज्वल गजभार मुंबई आणि सर्व गावकरी लोकांचा सहभाग आणि प्रतिसाद, कार्यक्रम ऐकण्यासाठी विशेष आमंत्रित मान्यवर मा.राजेंद्र तेलंगे, सरपंच रावेरी मा चित्तरंजन कोल्हे ता अध्यक्ष भारतीय जनता पक्ष राळेगाव मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच,मा बाळासाहेब देशमुख जेष्ठ नागरिक,मा डॉ कुणाल भोयर विनंती ला मान देऊन उपस्थित होते विश्वकर्मा बिझनेस गृप चा मित्र परिवार परिसरातुन विशेष उपस्थिती दाखवित होता प्रामुख्याने प्राचार्य आनंदराव चौधरी एकलारा मा प्रविण भाऊ तायडे पिंपंळखुटी विलासराव डंभारे सोनुर्ली मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ संदिप भाऊ तेलंगे नामदेवराव काकडे चारुदत्त नेरकर यवतमाळ मा महाजन रामतिर्थ ही सर्व मंडळी मा एकनाथ जी राउत यांच्या आग्रहामुळे हजर होती महाशिवरात्री महोत्सव रावेरी वर्षे पहिलं उज्ज्वल गजभार सुंदर गायक सुमारे तिन तास लोकांच्या प्रतिसादात गायन केले आणि हार्मोनियम ची साथसंगत मा गणेश राऊत यांनी दिली सर्व चार ही कोपऱ्यात ओम् नमः शिवाय गाणं गुणगुणत होते हजारो लोक हे महाशिवरात्री महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य होते आणि कार्यक्रमाच्या शेवटी मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच आणि मा एकनाथ जी राउत यांनी उज्ज्वल गजभार यांचे सहृदयी आभार मानले
