२२ वर्षीय युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या,चहांद येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

एका 22 वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील चहांद येथे दि 27 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.
तालुक्यातील चहांद येथील युवक श्याम ज्ञानेश्वर धोबे वय (२२) वर्ष या युवकाने गावालगत असलेल्या धनंजय जवादे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
श्याम हा घरून निघून गेला होता त्याची शोधाशोध सुरू केली असता, शेवटी त्यांच्या गावालगत असलेल्या शेतामधील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला, घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही.