आर्णी पोलीस ठाण्यातील कर्मचारी गुंतले वसुलीत?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

जिल्हा पोलीस अधिक्षकाचे आदेश ठरले कुचकामी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी एका पत्रपरीषेदेत शासन आदेश. असल्याशिवाय घाटांवर एकही वाहन दिसता कामा नये असा आदेश दिला होता त्या दिशेने तशी ठोस पावले सुद्धा उचलण्यात आली आहे असे सांगितले होते. मात्र आर्णी तालुक्यातील पैनगंगा नदीपात्राच्या राणीधानोरा घाटावरून एक नव्हेतर तब्बल २०० ट्रॅक्टर वाळुचा दिवस रात्र उपसा केला जात यावेळी पोलीस यंत्रणा काय करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळू तस्करांच्या दावणीला असलेल्या पोलीस ठाण्यातील काहि कर्मचार्यानी तर कळसच गाठला आहे. हप्ता वसुल करीत आहे त्यामुळे रेती वाहतुकीत अनेकांचे हात बरबटल्याचे ऐकायला मिळत आहे.