!! शिक्षणाला खेळाची सांगड घालूनच सर्वांगिन विकास साधता येतो.!! माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतरावजी पुरके

राळेगाव तालुक्यातील झरगड येथे काराई गोराई माता देवस्थान व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्याचे उद्घघाटन दिनांक २१/२/२०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड.प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहूणे विदर्भ मार्केटींग फेडरेशन नागपूरचे संचालक अरविंदभाऊ वाढोणकर,अंकुशभाऊ मुनेश्वर, निश्चलजी बोभाटे,शामकांतभाऊ येणोरकर, सरपंच झरगड सौ चंदाताई मोहन आत्राम, गजाननराव कुळकर्णी,प्रसादजी कुळकर्णी, किशोरभाऊ धामंदे, पुरूषोत्तम चिडे,प्रफुल्ल तायवाडे, सचिन राडे, मोहन आत्राम सर,प्रकाश झाडे,राजू राडे यांच्या उपस्थितीत पार पडला. दिनांक २१/२/२०२२ पासून १/३/२०२२ पर्यंत चाललेल्या कबड्डीच्या खेळात पस्तिस संघानी सहभाग नोंदवून आपला खेळ दाखवून प्रेक्षकांना आकर्षित केले.शेवटच्या दिवशी अंतिम सामना जय दुर्गा क्रिडा मंडळ परसोडी व खटेश्वर क्रिडा मंडळ पिंपळगाव रूईकर यांच्यात काट्याची लढत होऊन प्रथम बक्षिस ३१,००० रूपये परसोडी संघाने पटकावले. तर द्धितीय बक्षिस २१००० रूपये पिंपळगाव रूचकर या संघाने पटकावले तृतिय बक्षिस १५००० रुपये अंतरगाव चिखली या संघाने तर चौथे बक्षिस ११००० रुपये झरगडच्या संघाने प्राप्त केले. या सामन्याच्या बक्षिस वितरणाला महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपाध्यक्ष प्राध्यापक वसंतरावजी पुरके सर, आदर्श ग्राम रावेरीचे सरपंच, विकासपुरूष राजेंद्रभाऊ तेलंगे,बंजारा कर्मचारी संघटना राळेगाव तालुका अध्यक्ष श्रावनसिंगजी वडते सर,सरपंच झरगड सौ चंदाताई आत्राम, तेली समाज महासंघ यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अशोकरावजी काचोळे,दिलीप भोकटे, विश्वासराव किनवटकर, मोहन आत्राम सर,झाडगाव ग्रामपंचायत सदस्य सचिन राडे ग्राम पंचायत सदस्य अनिल पंधरे,गावातील प्रतिष्ठित नागरिक गोविंदराव झाडे,अजाबराव आत्राम, राजू राडे,प्रकाश झाडे,विजय राडे यांनी प्रेक्षकांच्या उपस्थितीत अंतिम सामन्याचा आनंद घेतला. या सामन्याचे पंच म्हणून श्रावनसिंग वडते सर व राजू राडे यांनी चोखपणे बजावले. खेळ संपल्यांनतर मा. पुरके सरांनी खेळाडूना मार्गदर्शन केले. सर आपल्या मार्गदर्शनातून म्हणाले कि ‘ शिक्षण आणि खेळाची सांगड घालूनच सर्वांगिन विकास साधता येतो.’ हे चालत असलेले सामने यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते रवि राऊत,संभा पंधरे,संजू पचारे,महेंद्र उईके,प्रभाकर नेहारे,श्रमिक राडे,अंकुश वगारहांडे,गोपाल नेहारे, रमन पंधरे रविराज झाडे, चिंतामन लांभाडे,दिलीप राऊत,विनोद गेडाम,मनोज पचारे,ऋतिक झाडे,मनिष राऊत,विकास गजबे,राजू लढी,आशिष लाभांडे,निलेश लढी,गुड्डू आत्राम,सुनिल मेश्राम,प्रफुल्ल भोयर,ईत्यादी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचलन देवेंद्र आत्राम सर यांनी केले तर वडते सर यांनी आभार मानले.