
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
जुले महिन्यात तालुक्यात अतिवृष्टइ झाली याची पाहणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली तसेच तालुक्यातील काही शेतकरीआत्महत्या ग्रस्त कुटुंबालाही त्यांनी भेटी दिल्या
तालुक्यातील झाडगाव येथे १८ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नंदिनी नदिला आलेल्या पुरामुळे झाडगाव येथील ६६३ हेक्टर शेत जमीन खरडुन गेली ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तसेच गावात पुराचे पाणी शिरल्याने घराचे मोठे नुकसान झाले होते विरोधी पक्ष.नेते अंबादास दानवे यांनी मंगला भोयर.यांच्या शेतातील बांधावर जाऊन शेताची पहाणी केली.तसेच झाडगाव येथीलच बंडू संगेवार या शेतकरीऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली होती त्याच्या कुटुंबालाही दानवे यांनी भेट दिली तसेच तालुक्यातील दापोरी कासार येथील पांडुरंग तपासे व किशोर ठिपके यांच्या शेताची पाहणी करून पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तर चहानद येथील ज्ञानेश्वर धोबे यांचे कुटुंबात दोन आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटूंबाला भेट देऊन दानवे यांनी त्यांचे सांत्वन केले व मदतीचे आश्वासन दिले तालुक्यातील पुराच्या नुकसणीबाबत विधान सभे मध्ये प्रश्न मांडु व सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना लाभ मिळवुन देऊ असे दानवे यांनी यावेळी सांगितले यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश.काळे तहसीलदार डॉ रविन्द्रकुमार कानडजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड विश्वास नांदेकर बाळासाहेब मुनगिनवार संजय रंगे दिगांबर मस्के किशोर.इगंळे संतोष ढवळे राळेगाव तालुका प्रमुख विनोद.काकडे शंकर गायधने सुरेन्द्र भटकर गणेश जामुनकर विजय पाटील.शेषराव ताजने गणेश चौधरी प्रशांत वारेकर सह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.याआधी विरोधी पक्ष नेते अजित पवार कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि आता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तालुक्याला भेटी दिल्या नुकसानीची पाहणी केली पण अजुनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत एक रुपयाही मदत न पोहचल्याने शेतकर्यांमध्ये रोष आहे झाडगाव येथे हा रोष शेतकऱ्यांनी दानवे यांच्यासमोर व्यक्त केला.
