
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256222
राळेगाव येथील बामसेफ चे जिल्हा उपाध्यक्ष मा. अरविंदभाऊ केराम यानी सविंधान वाटपाचा उपक्रम हाती घेतला असून संविधान वाटपाचे कार्य हे अनमोल असल्याचे मत त्यांनी संविधान वाटपा प्रसंगी व्यक्त केले.अरविंद केराम हे गेल्या पाच वर्षांपासून घराघरात गावागावात भारतीय संविधान वाटपाचे काम करत असून ते लग्नकार्य असो किंवा वाढदिवसानिमित्त अशा विविध कार्यप्रसंगी ते संविधान वाटपाचे कार्य करीत आहे. कारण संविधान हे ३९५ कलमाचे असुन संविधानात असलेले बहुजनांसाठी हक्क हे जोपर्यंत प्रत्यक्षात जनतेला माहिती पडत नाही त्यामुळे त्यांना स्वाभिमान बाळगता येणार नाही, याकरिता प्रत्येक घराघरात संविधान पोहोचले पाहिजे असे त्यांना वाटत असून ते प्रत्येक कोणत्याही कार्यात दुसरी कोणती वस्तू भेट न देता संविधान हे भेट देत आहे करिता त्यांच्या कार्याला तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
