
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
प्रभाग क्रमांक आठ मध्ये अंकतवार आणि जिड्डेवार यांचे घरा समोर एक वीज खांब रस्त्याच्या अगदी मधोमध असल्याने अनेक छोटे मोठे अपघात दररोज होत आहे. या विषयी नागरिकांनी व नगर पंचायत राळेगांव च्या वतीने तक्रार निवेदन अनेकदा देऊन ही,आणि विशेष म्हणजे वीज खांब काढण्यासाठी जी अग्रिम रक्कम वीज वितरण कंपनी राळेगांव कडे सहा महिने आधीच भरल्याचं सबंधितांच कथन असून या संदर्भात आता पर्यंत हा वीज खांब आणखी कोणाचा जीव घेणाऱ्या मोठ्या अपघाताची प्रतिक्षा तर करत नाही ना?असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांचा वीज वितरण कंपनी राळेगांव ला आहे.
