
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
गेल्या दोन महिन्यापासून लालपरी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी मैदानात उतरले आहे, लालपरी रोडवर धावण्यास सुरुवात झाली असून विना वाहक लालपरी धावत आहे त्यामुळे वाहक नसल्याने लालपरी मध्ये बसलेला प्रवासी हा वेगवेगळ्या थांब्यावर थांबतात, परंतु तिथे उभ्या असलेल्या प्रवासी हा त्यामध्ये वाहक नसल्याने लालपरी मध्ये बसू शकत नाही, त्यामुळे तेथे उभे असलेल्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या अगोदर अचानक वाहक व चालक यांचा संप असल्याने लाल परी संपूर्ण बंद होती परंतु गेल्या दोन महिन्यापासून सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये उल्हासाचे वातावरण निर्माण झाले गेल्या दोन महिन्याच्या अगोदर लाल परी चे खूप मोठे कंबरडे मोडले गेले होते, परंतु शासनाने यांच्यावरती पर्याय म्हणून खाजगी कंपनीला चालक नेमणुकीचा ठेका देऊन चालकाची नेमणूक केली, त्यानुसार लालपरी ची वाहतूक पुन्हा सुरळीत धावण्यास सुरुवात झाली परंतु वाहक नसल्याने प्रवाशांना विनातिकीट घेता येत नाही त्यानुसार प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो परंतु अधिकारी वर्ग मात्र आज रोजी एकही लालपरी विना तपासणीशिवाय समोर जाऊ देत नाही खरंच ही बाब खूप चांगली असून यापूर्वी चालक वाहक संपाच्या अगोदर महिन्यातून एक-दोन लालपरी तपासायेची त्यामुळे त्या लालपरी मध्ये वाहक आणि चालक असायचे विना टिकीट कोणी आढळल्यास प्रवासास दंड व वाहक यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायची परंतु आज रोजी सुरू असलेल्या लालपरी मध्ये वाहक नसल्याने सर्व जबाबदारी ही चालकावर आहे चालन का लालपरी चालवत असून अधिकारीवर्ग यांची चेकिंग झाल्यास चालक हा घाबरलेला आहे, आज रोजी प्रवाशांना होत असलेला नाहक त्रास हा मात्र कुतूहलाचा विषय आहे खाजगी चालक चालवत असल्याने अधिकारी वर्ग हा आपला रुबाब दाखविण्याकरिता प्रत्येक गाडी चेक करतात असा प्रवाशांना प्रश्न पडत आहे, राळेगाव वरून दहा वाजता निघालेली लालपरी ही बारा वाजता यवतमाळ येथे पोहोचतो त्यामध्ये मधोमत अर्धा ते पाऊण तास हा तिकीट चेक करण्यात जातो खरे पाहता लाल परीचे कंबरडे मोडले असताना पुन्हा चालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करणे सोयीचे आहे अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे याकडे संबंधित अधिकारी राज्य परिवहन महामंडळ लक्ष देतील का अशी अपेक्षा होत आहे.
