
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना बंद करून NPS योजना जी पूर्णपणे शेअर मार्केट वर आधारित आहे आणि यात कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही अशी योजना लादली आहे. नुकतीच राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांनी NPS बंद करून जुनी पेंशन योजना लागू केली आहे त्यानुसार पुरोगामी महाराष्ट्र सरकारने NPS योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करावी याबाबत काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान सभेत मागणी केली असून याबाबत दि 27 मार्च 2022 ला विधिमंडळ मध्ये लक्षवेधी लागणार आहे
त्यामुळे महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी NPS सारख्या फसव्या योजना सोडून राज्यातील सर्व कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा राळेगाव यांनी सादर केले यावेळी महेश सोनेकर, हेमंत सिडाम,विशाल किनाके,संदिप क्षीरसागर महसूल संघटना सचिव राजू ऐंडे, अध्यक्ष गजानन बालांडरे या सह तलाठी संघटना व इतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.
