कळंब तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी व्दारा केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन

ल0

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सुचनेनुसार दिनांक १-४-२०२२ रोजी कळंब तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी व्दारा केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.तहसिलदार कळंब यांना याबाबत निवेदन देण्यात आले.मागील ५-६वर्षापेक्षा जास्त काळापासुन केंद्रामध्ये भाजपा पक्षाचे सरकार असुन निवडणूक काळात जी आश्वासने देशातील जनतेला दिलेली आहेत ती सर्व फोल ठरली आहे.शेतकरी हवालदिल झाला असुन घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे.पेट्रोल व डिझेल च्या किम़तीमध्ये वर्षभरात सतत वाढ होत असल्याचे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत . सरकारी मालकीच्या अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करुन अनेकांना बेरोजगार करण्यात आले.आज देशात सर्व सामान्य कुटुंबाचे बेरोजगारी व महागाई मुळे जगणे कठीण झाल्याने अनेक कुटुंबे द्रारीद्रयाचे जीवन जगत आहे .वारंवार अनेक प्रकारचे आंदोलने तसेच विविध पातळीवर निवेदन देवून ही महागाई बाबत केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत असल्याने देशातील जनता अडचणींचा सामना करत आहे.या सर्व बाबींना जबाबदार शासनाचा निषेध करण्यात येवून महागाईवर अंकुश लावून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत तात्काळ नियंत्रण आणावे अन्यथा नागरिकांच्या हितासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला .या प्रसंगी माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके,प्रविणजी देशमुख ,राजुभाउ पोटे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब प्रविण भाऊ देशमुख,नगरसेवक चंदुभाऊ चांदोरे,सभापती योगेशजी धांदे,माजी सभापती सौ.संजिवनी कासार,नगरसेवक राजुजी भोयर, अशोकराव उमरतकर,समन्वयक राजुभाऊ पोटे, शहर अध्यक्ष सोनु सीद्दीकी,शफी कुरेशी, सिद्धेश्वर वाघमारे, आशीष जी धोबे,संतोषजी विधाते,ईमरानभाई,अमरजी चवरडोल , सुखदेव चावरे, सुधाकरराव सांळुके,साहेबराव वानखेडे,दिपक कदम,धर्मदास वाणी, केशववारजी,निलेश हजारे,समन्वयक सौ.गायत्री नवाडे,सौ.अर्चनाताई हजारे,पवन कासार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उन्मेष वसंतराव पुरके,कालोकारजी,शरदजी घोसले,नामदेवजी पोतदार ,परवेज भाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.