ऑनलाईन धान्य वितरण व्यवस्था कोडमडली ; तालुक्यातील संतप्त धान्य दुकाणदार संघटनेनी मोर्चा काढुन तहसिलदारांकडे पॉस मशिन केल्या जमा

उमरखेड –
धान्य वितरण विभागाने मागील काही दिवसां पासुन शिधा पत्रिका धारक सदस्यांचा ‘ के वाय सी ‘ थॅम्स घेऊन अनिवार्य केल्याने शासना कडुन या कामी पॉस मशिन देण्यात आली दुकाण दार यांच्या दिलेली मशिन सर्व्हर डाऊन असल्याने निष्कामी ठरत आहे या सर्व प्रकारामुळे कोणचेच थँम्प मशिन वर येत नसल्याने प्रत्येक गांवातील नागरिक संतप्त होऊन रास्त भाव दुकाणदार यांना हुज्जत घालू लागल्याने दुकाणदार या मानसिक प्रकाराला वैतागले असल्याने शासनाने पर्यायी व्यवस्था करावी म्हणून ५ ऑगस्ट रोजी स्थानिक बाजार समिती प्रांगणातून तालुक्यातील पुरुष व महिला १३९ रास्तभाव दुकाणदार यांनी मोठा सहभाग ठेऊन गळ्यात बंद पडलेल्या पॉस मशिन अडकवून तहसिलवर मोठा धडकवला
दुसरी एक इंटीग्रा . कंपनी ने ४ जी पॉस मशिन ला त्याचं नेटवर्क आहे अशा मशीनला कोणत्याही प्रकारे नेट येत नाही त्यामुळे राशन दुकानदार यामुळे कमालिचे त्रस्त झाले असून सुद्धा केवळ याच कारणामुळे शिधा धारकाला धान्य देता येत नाही जो पर्यंत कार्ड धारकाचा मशीनवर अंगठा लागत नाही तो पर्यंत त्या मशीन मधून धान्य वितरित होत नाही आणि त्यामुळे कार्डधारक दहा – दहा वेळा येऊन दुकानात येऊन वापस जात आहेत आणि वापस गेल्यानंतर कार्ड धारक दुकानदाराची बदनामी करत आहेत त्यामुळे आम्ही सर्व दुकाणदार त्रासून आम्ही आमच्या जवळ असलेली मशीन आज तहसील प्रशासनाकडे जमा करीत आहोत तद्वतच मशीन जमा केल्यानंतर आमचा संप सुद्धा चालूच ठेऊन राज्यस्तरावर सुरु ठेवत असलेले संपकरी सांगत नाही तो पर्यंत आमचा संप सुरुच ठेवणार आहोत असे मोर्चा चे नेतृत्व करणारे तालुका रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष रामराव गायकवाड , सचिव अली साहेब , उपाध्यक्ष अनिल देऊळवाड , कोषाध्यक्ष दुधेवार ,अर्जून जाधव , अविनाश जाधव , सुरज राठोड, बिट्टेवाड यांनी विशेष माहिती देतांना दरम्याण म्हणाले
मशीन चालू करा आणि लोकांना धान्य वाटप करा व आमचा सर्व शासनाकडे विनंती आहे की त्या मशीनवर जोपर्यंत पूर्णपणे नेटवर्क येत नाही आणि मशीन पुरेपूर रित्या चालू होत नाही तो पर्यंत आम्ही कुठलीही मशीन चालू करू शकत नाही आणि याच या बाबतीत प्रशासनां ने आमच्यावर दबाव आणू नये आणि वेळोवेळी त्या मशीनवर किंवा दुकानदाराला व्हाट्सअप द्वारे कोणत्याही सूचना देऊ नये जो पर्यंत नेटवर्क पूर्ण करा तेंव्हा आम्ही धान्य वाटप काम करायला तयार आहोत आम्ही सर्व परवाना धारक सेवा करण्यासाठीच शासनाचे कमिशन बेशिक एजंट आहोत त्यामुळे आम्हाला धान्याचे वितरण करून कार्ड धारकाची सेवा करणे गरजेचे आहे असे सर्व मोर्चेकरी दुकाणदार म्हणाले
अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मशीन जमा झाल्या आहेत आमच्या कमिशन वाढीसाठी वाडीच्या संदर्भात ज्या महागाईच्या निर्देशानुसार आम्हाला आता सध्यस्थित १५० रुपये कमिशन एका क्विंटल मागे मिळते , तेंव्हा त्या ऐवजी वाढीव म्हणून प्रति दुकाणदार यांना कमिशन न देता तीस हजार रुपये दुकाणदार यांना प्रत्येक महिन्याला द्यावेत अशी आमची आग्रही मागणी शासनाकडे या मोर्चाच्या माध्यमातुन संतप्त झालेल्या दुकाणदारांनी केली
मोर्चा दुपारी धडकल्यावर महसुल कार्यालयात संबंधित विभागांचे कर्मचारी अनुपस्थित असल्याने दुकानदारांनी तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले मोर्चात सर्वच दुकाणदांराचा सहभाग होता
सोबत –

Leave a Reply