

प्रतिनिधी//शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील ढाणकी शाखा येथील बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा मधील 2आगस्ट रोजी बँकेतील लॉकरमधून तारण ठेवलेले सत्तावन लाख रुपयाचं सोनं चोरणाऱ्या लिपिक व त्याच्या मित्राच्या विरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
सविस्तर माहिती अशी की लिपिक उमेश वाघ आपल्या मित्रा सोबत चोरलेले सोनं ढाणकी येथील सराफा दुकानात विकत असताना सराफा दुकानदारने त्याचे बिंग फोडता तो तेथून फरार झाला. ही वार्ता गावात पसरताच बँकेच्या ग्राहकानी आपल सोनं सुरक्षित आहे की नाही?हे बघण्यासाठी बँकेसमोर एकच गर्दी केली होती. जेंव्हा ढाणकी मध्ये सोन्याचा अपहार घडल्याचे मुग्धा देशपांडे बुलढाणा बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा विभागीय व्यवस्थापक यवतमाळ यांना कळताच ते रविवारी बँकेत चौकशीला आले असता बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा मल्टिस्टेट शाखा ढाणकी मधील उमेश सुनील वाघ याने सोने तारण कर्ज विभागातील ३० सोने तारण पाकीट ज्याचे अंदाजे आज रोजी चे बाजार मूल्य रुपये ५७ लाख रुपये हे सदर कपाटामधून १५ जुलै ते ०३आगस्ट २०२५ या मध्ये अपहार केल्याचे दिसून येताच,उमेश सुनील वाघ (२८)व रामेश्वर गजानन धुमाळे (२८ ) दोघेही रा. बेलखेड ता उमरखेड यांच्या विरोधात बिटरगाव पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमाक व कलम ३१६ (५),३१८(३) ३१८(४),३१९(२), ३ (५) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोद करण्यात आला असून.पुढील तपास कुमार चिता पोलीस अधिक्षक यवतमाळ, अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड याच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरिक्षक पांडुरंग शिंदे, पोउपनि सागर अन्नमवार हे करीतआहे.
सोने लंपास करणारा उमेश वाघ हा बुलढाणा अर्बन बँक शाखा ढाणकी येथे लिपिक पदावर दोन वर्षापासून कार्यरत आहे. त्याने ज्या ग्रहाकाचे सोनं लंपास केले आहे त्यांची भरपाई आमची बँक करणार आहे.
मुग्धा देशपांडे बुलढाणा अर्बन बँक विभागीय व्यवस्थापक यवतमाळ
काही महिन्याखाली ढाणकीत पतसंस्थानी ग्राहकांना चुना लावला असून त्यात राजस्थान व राजलक्ष्मी तसेच एका बँकेत कर्मचाऱ्याने बनावट सोने बनवुन बँकेत ठेवले घटना घडल्या असताना आज बुलढाणा अर्बन बँक मधील सोनं अपहार झाल्यामुळे ढाणकीत बँकेत पैसे, सोनं ठेवणं जोखीमचे झाल्याचे नागरिक म्हणत आहे.
