श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर पांडुरंगाच्या भेटीला,उद्या घेणार पंढरीत भगवान पांडुरंगाचे दर्शन

वणी :- श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर हे आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान पांडुरंगाच्या भेटीला आज ता. ८ एप्रिल रोजी रेल्वेच्या प्रवासाने रवाना झाले असून उध्या ते पंढरपुरात दाखल होणार आहे.
पंढरपूर येथील श्रीगुरुदेव सेवा संघाने ता. १० एप्रिल रोजी तातळीने एका बैठकीचे आयोजळजन ग्रामगीता तत्वज्ञान दिव्यदर्शन सभागृहात आयोजित केली असून या बैठकीला राज्यातील विविध जिल्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. अति महत्वाची बैठक असल्याने श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वणी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर हे आज वणी वरून पंढरपूरला रवाना झाले आहे ते उध्या ता. ९ रोजी पंढरपुरात दाखल होताच सर्व प्रथम पांडुरंगाचे दर्शन घेतील व राज्यातील शेतकरी, शेतमजूर, निराधार वयोवृद्ध , विधवा माता बघिनी आणि दिव्यांगांना सुख मिळू दे अशी पांडुरंगाच्या चरणी पार्थना करणार नंतर स्थानिक शेतकरी नेते व मित्र परिवाराला भेट देतील आणि शेतकऱ्यांच्या समस्येवर विचार विनिमय करतील. आणि ता. १० एप्रिलची बैठक आटोपून ते ११ मार्च ला परतीच्या प्रवासाला लागतील आणि ता. १२ ला ते वणीत दाखल होतील अशी माहिती माहितीच्या सूत्रांकडून मिळाली असून त्यांचे सोबत रामदास पखाले, महादेव ढेंगळे, रमेश पिंपळकर, सुनील ताजने आदि मान्यवर सोबत आहे.