बोगस बियाणासह 34 लाखाचा मुद्देमाल जप्त; पांढरकवडा पोलिसांची कारवाई

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

पांढरकवडा आदिलाबाद नागपूर नॅशनल हायवेवर पोलीस गस्त करीत असताना मौजा मराठवाकडी नजिक महिंद्रा पिकप क्रमांक के ए 40 ए 9994 वाहनावर संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता वाहन चालक एन मंजुनाथा नारायण रेड्डी व त्यांचा साथीदार व्यंकटेशराराव डग्गुबाती रा कर्नाटक मराठवाकडी नजिक महेंद्र बोलेरो पिकप मध्ये बोगस बियाणे आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांनी पांढरकवडा कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांना दिली. सदर ठिकाणाची पाहणी केली असता बोगस बियाणासह 34 लाखाचा मुद्दमाल जप्त करण्यात आले. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, शंकर बारेकर, वसंतराव चव्हाण, राजु सुरोशे, सिध्दार्थ काबळे यांनी ही कारवाई केली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.