एक हजार एक फुटाच्या भगव्या ध्वज रॅलीने वेधले लक्ष,रामनवमी उत्सवात तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

रामनवमी निमित्त आज यवतमाळातील तरुणांनी एक हजार एक फुटाच्या भगव्या ध्वज रॅलीचे आयोजन केले. या रॅलीने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागातून फिरल्यानंतर या रॅलीचा जयहिंद चौक येथील राम मंदीरात समारोप करण्यात आला.

दरवर्षी यवतमाळ शहरात निघणारी भव्य शोभायात्रा यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेत असते. या वर्षी मात्र यवतमाळ च्या तरुणांनी या शोभायात्रे सोबतच एक हजार एक फुटाच्या भगव्या ध्वज रॅलीचे आयोजन केले होते. यवतमाळ येथील विविध सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे निरव गढीया, विशाल गणात्रा, भाविक उन्नरकर, हितेश खालपाडा, अभिषेक सोमय्या, भुषण उन्नरकर, शुभांकर भट, चिराग सांगाणी, महेश पवार, विनीत हातगावकर, सुमित हातगावकर, प्रेम शाहु यांनी नियोजन करुन एक हजार एक फुटाचे भगवे कापड विकत आनले. सर्वप्रथम तिवारी चौक येथील राम मंदीर येथे या कापडाची पुजा करण्यात आली. त्यानंतर जवळपास अडीचशे ते तीनशे तरुण तसेच तरुणींनी हा ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन शहरातून मिरवणूक काढली. तिवारी चौक परीसरातील राम मंदीर येथून निघालेली ही मिरवणूक शहरातील विविध भागातून फिरल्यानंतर जयहिंद चौक येथील राम मंदीर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर या कापडाचे ध्वज बनवून सायंकाळी निघणा-या शोभायात्रेत वाटण्यात आले. रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या या भगव्या ध्वज रॅलीने शहर वासियांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तरुणांनी दिलेल्या जय श्रीराम च्या घोषणांनी परीसर दुमदुमून गेला होता. या आयोजनासाठी तरुणांना रघुवंशी महिला मंडळ, डेक्कन बुल्स क्रिकेट क्लब, जयविजय क्रिकेट क्लब यांचेही सहकार्य लाभले.

एकोपा कायम राहावा

रामनवमी हा उत्सव समाजातील सर्वच नागरीक उत्साहाने साजरा करतात. आम्ही यवतमाळात प्रथमच अशा पध्दतीने एक हजार एक फुटाचा ध्वज तयार करुन भगवा रॅली काढली. नागरीकांनी या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरवर्षीच अशाच पध्दतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून राम नवमी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहो. आजचा हा सन सर्वच धर्मातील नागरीकांनी एकोप्याने साजरा केला. हा एकोपा तसेच प्रेम असेच कायम राहणे गरजेचे आहे.