
भारतीय संविधानाचा “सन्मान, सुरक्षा व संवर्धन” करण्याची सर्व लोकांची जबाबदारी आहेत. – प्रा. विजय गाठले.
वरोरा | १४ एप्रिल २०२२
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील राज्यशास्त्र व समाजशास्त्र विभागाच्या वतिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय संविधान या विषयावर गुरूवार दिनांक १४ एप्रिल २०२२ ला व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. मृणाल काळे. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेश गजभे. राज्यशास्त्र विभाग, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. विजय गाठले. राज्यशास्त्र विभाग विराजमान होते. कार्यक्रमाचे सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद सातपुते. समाजशास्त्र विभागा यांनी आपल्या प्रास्ताविकेत कार्यक्रमाचे रुपरेषा भारतीय राज्यघटना चे सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. विजय गाठले. यांनी बोलताना भारतीय संविधानव असल्याने लोकांचे जीवन जगण्याची, शिक्षण, नौकरी, आरोग्य, रोजगार, महिलांचे अधिकार आजचा घडीला सुरक्षित आहेत. त्याच प्रमाणे संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फारच प्रयत्न शील तरतूदी करुन ठेवल्या आहेत. हे सर्व अधिकार कायम ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचा “सन्मान, सुरक्षा व संवर्धन” (3S) करण्याची आम्हा सर्व लोकांची जबाबदारी आहेत. काय ती आम्ही देशातील लोक पाळतो? विद्यार्थी मित्रांनो काय आपण त्यासाठी लोकांना जागरूक करण्याकरता 3S राष्ट्रव्यापी अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रा. राजेश गजभे राज्यशास्त्र विभाग यांनी सांगताना भारतीय संविधान यांची काळाची गरज राज्यघटनेत असलेल्या सर्व कायदे नियम विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद सातपुते. यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ प्रविण मुधोळकर यांनी केले कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तक्षशिल सुटे, समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ रंजना लाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ नरेंद्र पाटील. यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा.हर्षल चौधरी ,प्रा.अमोल ठमके, प्रा.निलेश क्षीरसागर, प्रा.प्रणय दाते तसेच समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.
