अंतरगाव येथे शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

अंतरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा दिं १८ एप्रिल २०२२ रोज सोमवारला आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून शैक्षणिक घोषवाक्य देत प्रभातफेरी काढण्यात आली असून या प्रभातफेरीला विद्यार्थी तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद नागोसे, उपाध्यक्ष सौ.सविता दूधकोहळे मुख्याध्यापिका रंजना कळबे, सहाय्यक शिक्षिका ज्योती होले, अंगणवाडी सेविका मुनताई, व मुरारताई, तसेच शाळा समिती सदस्य सौ.ज्योतीताई बावणे,सौ. कल्पनाताई वाघमारे, सौ.नीता घराट, सौ.जय ठाकरे आदी सह पालकांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात करण्यात आली होती मागील दोन वर्षापासून कोरोना या प्रकोपामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला आहे तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रे बंद झाले होते त्यामुळे या वर्षी शाळेत दाखल होणारे बालके व पहिलीमध्ये दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काही झाले नाही त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने तयारी करून घेण्यासाठी अभियान निश्चितच मदत करणार आहे या अभियानात शाळा स्तरावर पहिलीत दाखल होणारे विद्यार्थ्यां व त्याच्या पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्या दरम्यान पहिली दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे किंवा पालकांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गावातील विद्यार्थी व पालकांनी सहकार्य केले.