
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दैनिक साहसिक वर्धा चे संपादक रवीद्र कोटम्बकर यांचेवर नुकताच प्राणघातक हल्ला झाला तेव्हा हल्लेखोरांना तात्काळ अटक करा तसेच पत्रकारांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले।।दैनिक साहसीकचे संपादक रवींद्र कोटम्बकर यांचेवर नुकताच जीवघेणा हल्ला झाला कोटम्बकर यांचेवर झालेला हल्ला हा लोकशाहीच्या चौथया स्तंभावर झालेला हल्ला असून या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व भविष्यात पत्रकारावर अश्या प्रकारचे हल्ले होऊ नये यासाठी शासनाने कठोर कायदे करावे अश्या आशयाचे निवेदन राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉ रवींद्रकुमार कानडजे यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे सचिव फिरोज लाखानी उपाध्यक्ष दीपक पवार ,विशाल मासुरकर कोषाध्यक्ष रितेश भोंगाडे ,अशोक पिंपरे ,मोहन देशमुख ,महेश शेंडे,डॉ कैलास वर्मा ,प्रकाश मेहता, मंगेश राऊत संजय दुरबुडे राष्ट्रपाल भोंगाडे ,मनोहर बोभाटे अरविंद तेलंगे ,रामू भोयर ,गुड्ड मेहता , आदी उपस्थित होते.
