रूग्णसेवा हाच माझा धर्म,ना गाजा ना वाजा,समाजसेवा धर्म माझा,रितेश भरूट सौ.प्राची भरूट यांचा अजेंडा.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्ह्यातील लोकं अनेक समस्यांना तोंड देत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.अशातच सामान्य परिस्थितीतील लोकांना प्रकृती बिघडल्यानंतर खाजगी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे शक्य नसल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करण्यासाठी यवतमाळला जावे लागायचे.अशातच तेथे गेल्यानंतर त्यांचे कुणी ओळखीचे नसायचे,त्यांना काय करावे हे सुचेनासे होत असे.अशातच यवतमाळमध्ये रितेश भरूट नावाचे एक देवदूत उदयास आले.एक म्हण प्रचलित झाली आहे.ती म्हणजे,// देवाने धाडला गरीबाचा मानुस.//अशा प्रकारे यवतमाळ येथील दवाखान्यात गेल्यावर एकच चर्चा सुरू असायची, रितेश भरूट नावाचे कोणीतरी असतात.ते सर्वांना सहकार्य करतात.म्हणून रितेश भाऊंना फोन करून दवाखान्यात यायला सांगायचे, भाऊंना फोन केला कि भाऊ कुठल्याही प्रकारची शिफारशीची अपेक्षा न करता , कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता एक मानव धर्म म्हणून ताबडतोब दवाखान्यात येऊन पेशंटला भरती करण्याची प्रक्रिया सुरू करून नातलगाचे समाधान करायचे,सोबतच खाजगी दवाखान्यात सुध्दा डाक्टरांना भेटून कमीतकमी खर्चात तपासणी,आपरेशन करून व नातलगांना धीर देऊन समाधान करायचे. अशातच एखाद्या पेशंटला काही पैशाची वगैरे अडचण असेल तर त्यांना फुल ना फुलाची पाकळी, अशी मदत करायचे,अशातच त्यांनी राळेगाव तालुक्यातील अनेक गावांतील लोकांना कोरोना काळात सुध्दा सहकार्य करून जिवदान दिले, राळेगाव तालुका सोडायचं पण यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील पेशंट असो त्यांना मदत करायचे.अशाप्रकारे राळेगाव तालुक्यातील चहांद येथील दादारावजी गवारकर,वय,83 वर्ष यांना हार्ट अटॅक आल्यामुळे यवतमाळ येथील डॉ सतिश चिरडे यांचेकडे भरती केल्यानंतर डाक्टरानी 90% ब्लाकेज असल्याचे सांगून रितेश भरूट यांच्या सहकार्याने बायपास सर्जरी करून सुखरूप परत पाठवले, त्याचप्रमाणे वाढोणाबाजार रामदासजी लालसरे यांना सुध्दा हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना डॉ सतिश चिरडे सर यांच्या कडे भरती करून ऐन्जिओग्रापी केली असता 90% ब्लाकेज असल्याचे सांगून त्यांचे बायपास सर्जरी करून त्यांचेशी हितगुज करून त्यांना समाधानित केले.अशाप्रकारे हा देवदूत उदयास आल्यामुळे सामान्य माणसाला एक हिम्मत झाली असून यवतमाळला गेल्यावर आपले रितेश भाऊ तेथे असतात अशी चर्चा सुरू असून या ध्येय वेड्या तरूणाला आपल्या समाजसेवेतून काय साध्य करायचे आहे ते कळायला मार्ग नाही परंतु आज मात्र दोन्ही पती पत्नी रितेश भरूट व सौ प्राची भरूट हे रात्रंदिवस समाजसेवेत लागून असल्याने सामान्य लोकांमध्ये आनंदी वातावरण पसरले असून हा देवदूत खरोखरच वसंतराव नाईक हाॅस्पिटलमध्ये सतत फिरत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली तेवढी कमीच असून हा देवदूत जनसामान्यांसाठी दुवा ठरल्याचे दिसून येत असून रितेशभाऊ तुमच्या या महान कार्याला यवतमाळ जिल्हावासियाकडून आमचा सलाम.