देशमुख कुटुंबासोबत पवार कुटुंब आहे – आमदार रोहित पवार,महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीसाठी केंद्राचा प्रयत्न -आमदार रोहित पवार

तुमचा आमदार निर्दोष आहे – आमदार रोहित पवार

रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पंचायत समिती, काटोलचे आयोजन

माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांचे वाढदिवसाचे निमित्त


काटोल – माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती काटोलच्या वतीने रक्तदान शिबिर व महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, केंद्र सरकारने अतिरिक्त कर वाढविला म्हणून पेट्रोल व गॅसचे दर वाढले.पर्यायाने महागाई वाढत आहे.महाराष्ट्र राज्याचे केंद्र शासनाकडे २८ हजार कोटी केंद्राकडे थकबाकी आहे.
महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा केंद्राचा डाव आहे.मात्र त्यात केंद्रशासन कधीही यशस्वी होणार नाही. ई डी, सी.बी.आय चा गैरवापर होत आहे.अनिलबाबू यांच्या घरावर १२२ वेळा धाडी पाडून मानसिक खच्चीकरण होत आहे.तुमचा आमदार निर्दोष आहे.देशमुख कुटुंबासोबत पवार कुटुंब आहे.अनिलबाबू लवकर बाहेर येतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रोहीतदादा पवार तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य सलीलदादा देशमुख, जि.प.सदस्य समीर उमप,माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, राष्ट्रवादी प्रवक्ते प्रविण कुंटे, धम्मपालजी खोब्रागडे (सभापती पं.स.काटोल),
अनुराधाताई खराडे (उपसभापती), संजय डांगोरे , अरुणऊईके , निशिकांत नागमोते,चंदाताई देव्हारे ,लताताई धारपूरे,प्रतिभाताई ठाकरे, चंद्रशेखर कोल्हे, चंद्रशेखर चिखले प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, धर्म व पूजा हा वैयक्तिक विषय आहे.याचा वापर राजकारणासाठी होऊ नये.अलीकडे भाषणातून तरुणाईचे डोके भडविण्याचा प्रयत्न सूरु आहे.मात्र महाविकास आघाडी हे कधीही खपवून घेणार नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती धम्मपाल खोब्रागडे, संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन उपसभापती अनुराधाताई खराडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपसभापती अनुप खराडे, गट विकास अधिकारी संजय पाटील, गणेश चन्ने, गणेश सावरकर, संदीप ठाकरे, संदीप वंजारी, तारकेश्वर शेळके, उज्ज्वल भोयर , डॉ.राजू कोतेवार आदींनी अथक परिश्रम घेतले.

बॉक्स
काटोल विधानसभेची विकासकामासाठी ६७४ कोटी रुपये मंजूर झालेले आहे.यासाठी जि.प.सदस्य सलील देशमुख यांनी मंत्रालय पर्यत पाठपुरावा केला.