
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शासनाने प्रत्येक स्तरावर कारभार करता यावा म्हणून प्रशासनाची विभागणी केली तसेच ग्रामस्तरावर विकास करता यावा यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती केली आहे. या ग्रामपंचायतीला नागरिकांकडून कर वसूल करावा लागतो व त्यावरच ग्रामविकासाचा आराखडा तयार करावा लागतो नागरिकाकडून पाणी कर, घरपट्टी कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, आदी यासारखे कर वसूल करावे लागतात परंतु काही नागरिक कर भरण्यासाठी टाळाटाळ करत आहे त्याचा परिणाम ग्रामीण विकासावर होत असून राळेगाव तालुक्यातील वालधूर गट ग्रामपंचायत मधील गावातील नागरिकांकडे ७ लाख ४९ हजार रुपये कर थकीत असून यावर्षीचा नागरिकांकडून आजपावेतो चालू कर १ लाख ३४ हजार असा जमा झाला असून आणखी जवळपास सहा लाख रुपये येणे बाकी आहे.तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती असून अनेक ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याने अनेक गावातील विकासकामना खीळ बसली आहे. या थकीत असलेल्या करामुळे ग्रामपंचायती नागरिकांपुढे हतबल झाली आहे. या थकीत कराबाबत ग्रामपंचायतीने वारंवार सांगूनही नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे गावातील विकास कामांना खीळ बसली आहे.
गाव विकासासाठी कर आवश्यक
एकंदरीत गावचा विकास करायचे म्हटले तर गावातील कर वसुली पूर्ण होणे आवश्यक आहे तरच वसूल झालेल्या करातून गावात विविध सुधारणा करता येतात नवीन रस्ते, नाली, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य विषयी, विविध सुविधा गावात उपलब्ध करता येतात परंतु सर्वच गावातील नागरिकांची कर भरण्याविषयी उदासीनता दिसून येत आहे त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कर भरावा जेणेकरून गावात विकास कामे करता येतील असे आवाहन वारंवार ग्रामपंचायतीकडून केले जात आहे.
प्रतिक्रिया
थकित करामुळे ग्रामविकासास एक प्रकारची खीळ बसलेली आहे त्यामुळे नागरिकांनी थकित कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून वसूल झालेल्या करातून ग्रामविकासाचा आराखडा आखून गावात विविध विकास कामे करता येईल.
प्रवीण नरडवार
प्रवीण नारडवार सरपंच, गट ग्रामपंचायत
वालधूर
