
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दि. 16/05/2022 रोजी फिर्यादी नामे रविंद्र महादेवराव चर्जन वय 57 वर्ष रा. पद्मावती नगर, नागपुर रोड, वर्धा यांनी तक्रार दिली की, दि. 16/05/2022 रोजी सकाळी 10/30 वा दरम्यान ते हरेकृष्ण मंगल कार्यालय राळेगाव येथे नातेवाईकांचे लग्न असल्याने त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक MH 32V 1543 ही मंगल कार्यालयाजवळ पार्किंग मध्ये पार्क करुन लग्नाला गेले व लग्न लावुन 02/30 वाजता मंगल कार्यालय बाहेर येउन पाहिले असता त्यांची मोटार सायकल किं. अं. 30,000/- रुपये मिळुन आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे अशा फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन राळेगाव येथे अपराध क्रमांक 128/22 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच दि. 11/06/2022 रोजी 15/55 वाजता फिर्यादी नामे धिरज रामदास चव्हाण वय 44 वर्ष रा. मातानगर, राळेगाव यांनी जबानी रिपोर्ट दिला की. दि. 02/06/2022 रोजी त्यांची पॅशन प्रो मोटार सायकल क्रमांक MH 29 B 6739 किंमत अंदाजे 40,000/- रुपये ही त्रिमुर्ती मंगल कार्यालय जवळ त्यांचे ऑफिस खाली पाकींग करुन बाहेर येवुन पाहिले असता त्यांची मोटार सायकल मिळुन आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली अशा जबानी रिपोर्ट वरुन पो.स्टे. राळेगाव येथे अप.क्र. 143/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच दि. 11/06/2022 रोजी 17/34 वाजता फिर्यादी नामे संतोष चिंधुजी तेलंगे वय 52 वर्ष रा. तेजनी
ता. राळेगाव यांनी जबानी रिपोर्ट दिला की, दि.06/06/2022 रोजी त्यांची होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक
MH 29 P 6642 किंमत अंदाजे 25,000/- रुपये ही त्रिमुर्ती मंगल कार्यालय जवळ त्यांचे ऑफिस खाली पार्किंग करुन बाहेर येवुन पाहिले असता त्यांची मोटार सायकल मिळुन आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली अशा जबानी रिपोर्ट वरुन पो.स्टे. राळेगाव येथे अप.क्र. 144/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांची गांभीयाने दखल घेत मा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. राळेगाव यांनी सदर •प्रकरणाचा तपास करणेकरीता एक पथक स्थापन करुन तपासाबाबत आदेशीत केले होते.
सदर प्रकरणात मा.पो.नि.सा. यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 11/06/2022 रोजी तपास पथक शहरात पेट्रोलिंग करत असतांना एक इसम मोटारसायकलसह फिरतांना दिसला त्याची संशयास्पद हालचाल पाहुन त्यास थांबवून त्याच्या मोटारसायकल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पळुन जाण्याचा प्रयत्न केल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. आरोपीस विचारपुस दरम्यान पो.स्टे. अभिलेखावरील गुन्हे तपासले असता सदर संशयीत इसमाच्या ताब्यातील मोटार सायकल ही पोलीस स्टेशन राळेगाव येथे दाखल अपराध क्रमांक 128/22 कलम 379 भादवि मधील चोरी केलेली मोटारसायकल असल्याचे दिसुन आले. सदर आरोपीस अधिक विचारपुस केली असता त्याने पोलीस स्टेशन राळेगाव येथील अप.क्र. 143/22 कलम 379 भादवि व अप.क्र. 144/22 कलम 379 भादवि चे गुन्ह्यातील दोन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. वरुन त्याच्याकडुन मो.सा. क्र. MH 29 B 6739 व MH 29 P 6642 अशा दोन मोटारसायकल देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत, आरोपी नामे अजय रमेशराव करलुके वय 33 वर्ष रा. रामतीर्थ ता. राळेगाव जि. यवतमाळ यास अप.क्र. 128/22 कलम 379 भादवि मध्ये अटक करण्यात आली असुन त्याच्या ताब्यातुन वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील तीन मोटारसायकल असा एकुण 95,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यास इतर गुन्ह्यांबाबत अधिक विचारपुस सुरु आहे. सदर तपास कामी राळेगाव येथील पत्रकार श्री. संजय दुरबुडे यांनी महत्वाची माहिती देऊन मदत केली आहे.
सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ, डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, श्री. प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या आदेशाने संजय चोबे पोलीस निरीक्षक पो.स्टे. राळेगाव यांच्या मार्गदर्शनात पोउपनि मोहन पाटील, पोहवा गोपाल वास्टर, नापोकॉ नितीन गेडाम, नापोकों सुरज चिव्हाणे, नापोकॉ विशाल कोवे, नापोकों सुरज गावंडे, पोकों संतोष मारबते पो.स्टे. राळेगाव, यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. तसेच सदर तपास कामी राळेगाव येथील पत्रकार श्री. संजय दुरबुडे यांनी महत्वाची माहिती देउन मदत केली आहे.
