वनोजा अध्यक्षपदी श्री केशवरावजी पडोळे पाटील तर उपाध्यक्षपदी श्री भोजराज रहाटे यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वनोजा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालकाची अविरोध निवड झाली असून या संचालकां मध्ये डॉ.पुरूषोत्तम उगेमुगे,श्री प्रफुल्ल तायवाडे,श्री अभय पुडके, श्री अशोक काचोळे, श्री चंद्रशेखर उगेमुगे श्री उमेश बुरले,श्री संदीप चिंचोणे,श्री गजानन भटकर,श्री सैनदास पवार,श्री केशवरावजी पडोळे,श्री भोजराज रहाटे,सौ.संगिता वैरागडे,श्रीमती विजया कावडे यांची निवड झाली असून आज दिनांक 09/06/2022 रोज गुरूवारला झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत श्री केशवरावजी पडोळे पाटील यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी श्री भोजराज रहाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूकीदरम्यान डॉ उगेमुगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री विनायकराव बरडे, श्री प्रभाकर दांडेकर,श्री विजय येणोरकर,श्री मोरेश्वर वटाने,श्री अभय कावडे,श्री दिनेश वैरागडे व इतर चिखली,वनोजा येथील समस्त मतदारांनी, कार्यकर्त्यांनी ही निवड पार पाडल्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून ही संस्था सुद्धा काँग्रेसच्या वाट्याला गेली असून या संस्थेवर कांग्रेस कमेटीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री प्रफुल्लभाऊ मानकर यांची पकड कायम असल्याचे दिसून आले.