
प्रतिनिधी: श्री चेतन एस. चौधरी
नंदूरबार:- लीड स्कुल या बहु नामांकित संस्थेच्या वतिने सम्पूर्ण भारत भर घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत इरा इंटरनेशनल स्कुल खापर जिल्हा- नंदुरबार येथील विद्यार्थी सूरज सुनील पवार सुपर १०० मध्ये पात्र ठरला , विद्यार्थ्यांना 10वी सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षेत अव्वल होण्यासाठी मार्गदर्शन करणारा एक विशेष कार्यक्रम लीड कडुन आयोजित केला होता. त्यात सम्पूर्ण भारत भर ४ हजार हुन अधिक शाळांनी व १ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्या परीक्षेत इरा इंटरनेशनल स्कुल खापर येथील ४० विद्यार्थ्यानी ही ४ मे २०२२ या दिवशी ही परीक्षा दिली व आज त्याचा निकाल आला. त्यात सूरज सुनील पवार सुपर १०० मधे पात्र ठरला त्याला आता 10 वी सीबीएसई (CBSE) परिक्षे संबंधीत पुढील मार्गदर्शन आय. आय. टी. तील अनुभवी तसेच तज्ञ मार्गदर्शन करतील . या यशस्वी विद्यार्थ्याचे मार्गदर्शक शिक्षक सोनल महाजन , अरविंद पाडवी , अजय वलवी , मनोहर लोहार व अश्विन सोनार हे होते तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. निलेश अहिरे व संस्थेचे चेअरमन श्री. योगेश राजेंद्र सोनार यांनी शुभेच्छा दिल्यात .
