मुख्य रस्त्यावर कोसळले भले मोठे झाड, मोटरसायकल स्वार किरकोळ जखमी

प्रतिनिधी:- श्री.चेतन एस. चौधरी


नंदुरबार:- शहरातील धुळे चौफुली जवळील शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भले मोठे गुलमोहोरचे झाड जोरदार वाऱ्यामुळे कोसळले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वारावर ते कोसळले. दैव बलवत्तर म्हणून मोटरसायकल स्वार किरकोळ जखमी झाला. परंतु त्याच्या मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जवळच उभी असलेली एक कार चे सुद्धा किरकोळ नुकसान झाले. सदर रस्ता हा मुख्य रहदारी चा असल्याने मोठी हानी होऊ शकली असती. यावेळी थोड्या वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतु नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ती सुरळीत केली.
नंदुरबार शहरात अश्या जीर्ण झाडांची समस्या ऐरणीवर असून नगरपालिका प्रशासनाने ती झाडे तात्काळ हटवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.