
प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी
नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण परिसरासाठी महत्वाची व सोयीची असलेली नंदुरबार-मुंबई सेंट्रल बोगी पुन्हा सुरू करण्यात येत आहे. येत्या ७ जून पासून ही रेल्वे पूर्ववत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली ही रेल्वे नंदुरबार सह संपूर्ण परिसरासाठी सोयीची आहे. शासकीय कामे, व्यापारी, तसेच विद्यार्थी यांच्यासाठी या रेल्वेची आवश्यकता होती.
नंदुरबार, खांडबारा,नवापूर,व्यारा तसेच दोंडाईचा परिसरातील प्रवासी या रेल्वेचा उपयोग करतात.
कोविडची परिस्थिती निवळल्या नंतर ही रेल्वे पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांची होती.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व सुरतच्या खासदार दर्शना जारदोश यांनी याबाबतची माहिती ट्विटर वरून दिली. यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
