
प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी
नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्यातील ढंढाने येथे, विकासरत्न सहकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा, धुळे येथील विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय ढंढाने येथे भेट देऊन थेट शेतात शेतकऱ्यांना माती परिक्षणा बद्दल मार्गदर्शन केले.
कृषिदुतांनी यामध्ये माती परिक्षणाचे उद्देश, माती नमुना घेताना घ्यावयाची काळजी, नमुना कसा घ्यावा व त्याबद्दलची पद्धत आणि मातीच्या नमुण्यासोबत पाठवण्याचे माहिती पत्रक याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ढंढाने गावातील सरपंच- आक्काबाई श्रावण सोनवणे, उपसरपंच – योगिता जितेंद्र ठाकरे
प्रगतशील शेतकरी – नाना पांडुरंग ओगले , विनोद दिनेश घुगे, जयेश राकेश नागरे, राजेंद्र बाबुराव गाबाने, वाल्मीक रेवळी नागरे, दिलीप मुरलीधर नागरे, दीपक बाबुराव नागरे, देविसिंग नवलसिंग घुगे अनेक प्रगतशील शेतकरी सह कृषिदूत हसमुख नाईक, आकाश पाटील, विश्वजित निकम, निखिल पाडवी, गुरुराज राऊत, कृष्णा घुगे, प्रणव बिरारीस ,विश्र्वदिप वाघमोडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील प्राचार्य डॉ. आर. बी. राजपूत, कार्यक्रम समन्वयक प्रा. सुरज चांदूरकर, डॉ. कोमल भास्कर प्रा. अक्षय पडघन, प्रा. सुदर्शन सुरडकर, निकेश राजपूत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
