ग्रामविकास सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षांना मिळाले सर्वाधिक मतदान, वेळेस सर्वाधिक मताधिक्य

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष जानराव गीरी यांना एकूण झालेल्या मतदानात ७१२ पैकी ५०१ मते मिळाली, सर्वाधिक मताधिक्य जानराव गीरी यांना मिळालेले आहे. मागील पंचवार्षिक मध्ये देखील सर्वाधिक ४४९ मते मिळाली होती.
काँग्रेस पक्ष व शिवसेना समर्थित पॅनेल चे तेरा ही उमेदवारां ना लक्षणीय मते मिळाली असून,नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीत पूर्ण बहूमताने अकरा नगरसेवक नगरसेविका निवडून आले होते. राळेगांव शहरात ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था ही शेतकऱ्यां साठी खूप महत्त्वाची असून,आतापर्यंत च्या सर्व अध्यक्षांनी,संचालक मंडळाने ही संस्था भरभराटीस नेली हे सभासद मतदारांना चांगले च अवगत असल्याने,पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष व शिवसेना समर्थित पॅनेल च्या संपूर्ण तेरा ही उमेदवारां ना निवडून देत विश्वास ठेवला आहे. असाच मोठा विश्वास दाखवत नगर पंचायत राळेगांव च्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे अकरा नगरसेवक नगरसेविका निवडून दिले होते.