

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या आज शांततेत पार पडलेल्या निवडणूकीत व मतमोजणी अंती काँग्रेस,शिवसेना समर्थित शेतकरी विकास आघाडी पॅनेल च्या तेरा ही उमेदवारां ना लक्षणीय मते मिळाली असून,
दणदणीत विजय मिळवला आहे. मतदार सभासदांनी काँग्रेस पक्षाचे सर आणि भाऊ यांचे वर परत एकदा विश्वास ठेवला आहे.
नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे,विद्यमान अध्यक्ष जानराव गीरी,राजेश काळे,विनायक नगराळे,सौ.ज्योती डाखोरे,सौ.वीभा गांधी,विनोद नरड,अशोक पिंपरे,सचिन हूरकुंडे,तातेश्वर पिसे,कृष्णराव राऊळकर,गजानन पाल,गजानन महाजन,प्रभाकर राऊत हे आहेत.
