
.
सुर्ला (वरोरा),
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थीनींनी गावकरी मंडळी सोबत जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री महादेव पिदुरकर, श्री. गजानन पिदूरकर, श्री. उत्तम पिंपलशेंडे, श्री. इंद्रदासजी अमाने आणि श्री. योगेश देसाई उपस्थित होते. विद्यार्थीनींनी गावकऱ्यां सोबत मिळून वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. चिमुकल्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. प्रमुख पाहुण्यांनी गावकऱ्यांना तसेच भावी पिढी ला पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. उपस्थित विद्यार्थिनी अनुषा शेट्टी, हर्षिता अल्लाबोइना, प्रमिला बाबर, वेदांती भोसले, नीलिमा मिलमिले यांनी प्राचार्य डा. सुहास पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित केला.
