
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मौजा वरुड येथील श्री रघुनाथ स्वामी देवस्थान यांच्या झालेल्या गैरकारभाराविषयी दिं २६ मार्च मार्च २०२२ रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालय यवतमाळ येथे व २९ एप्रिल २०२२ रोजी धर्मदाय आयुक्त अमरावती येथे पत्राद्वारे लेखी तक्रार केली असता अद्याप या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नसल्याने भोरे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लेखिपत्राद्वारे तक्रार केली आहे.
त्याचप्रमाणे उत्तम भोरे यांनी श्री रघुनाथ स्वामी देवस्थान मध्ये झालेल्या गैर कारभाराविषयी माहितीच्या अधिकारात माहिती सुद्धा मागवली असतांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती पुरविण्यात आलेली नाही तेव्हा जिल्हाधिकारी साहेब यांनी श्री रघुनाथ स्वामी देवस्थानच्या केलेल्या गैर कारभाराविषयी सखोल चौकशी करून योग्य न्याय द्यावा अन्यथा ६ जून २०२२ पासून श्री रघुनाथ स्वामी देवस्थान वरुड जाहागीर येथे उत्तम गजानन भोरे वरुड व गोविंदराव झाडे झरगड आम्ही दोघेही आमरण उपोषणाला बसणार आहे जो पर्यंत श्री रघुनाथ स्वामी देवस्थानच्या झालेल्या गैरकारभाराविषयी चौकशी करून आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे एका लेखीपत्राद्वारे केली आहे.
