अन् पोलिसांनी दिला शोध घेण्याचा सल्ला?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

घराच्या आवारात ठेवून असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना राळेगाव येथे घडली. पत्रकार संजय बबनराव दुरबुड़े यांच्या मालकीची ही दुचाकी होती. या संदर्भात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी त्यांना इतरत्र शोध घेण्याचा सल्ला दिला. दोन दिवस शोध घेऊनही दुचाकी सापडली नाही. राळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही अनेक दुचाकी चोरी गेल्या आहेत.
पोलिसांना अपवादानेही दुचाकीचा शोध घेण्यात यश आलेले नाही.