
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
.
अतीशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वडकी येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी परीवर्तन पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.या निवडणुकीत एकुण १३ उमेदवार रिंगणात होते.पैकी शेतकरी परीवर्तन पॅनलचे तब्बल १२ उमेदवार निवडून आले असून विरोधी गटाला मात्र एका जागेवर समाधान मानावे लागले.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत प्रफुल्ल मानकर गटाचे सागर इंगोले व शिवसेनेचे मनोज भोयर यांनी गावातील प्रतिष्ठीतांना एकत्रित करत आपले १३ उमेदवार रिंगणात उतरवले होते तर डॉ नरेंद्र इंगोले यांच्या गटाने सुध्दा १३ उमेदवार या निवडणुकीत उभे केले होते.विजयी उमेदवारांमध्ये एकनाथ भोयर,सागर इंगोले, त्र्यंबक बरडे, नारायण फुटाणे, विनोद देठे, शंकर कोरडे, सचिन फुटाणे, नरेंद्र आत्राम, रत्नमाला उदार, मयुर कडू, राधाबाई भोयर व शेख इस्माईल शेख सत्तार हे शेतकरी परीवर्तन पॅनलचे १२ उमेदवार निवडून आले.तर डॉ इंगोले यांच्या गटाचे त्र्यंबक दत्तात्रय महाजन हे एकमेव उमेदवार निवडून आले.शेतकरी परीवर्तन पॅनलचे १३ पैकी १२ उमेदवार निवडून आणण्यात येथील शिवसेनेचे नेते मनोज भोयर, माजी सरपंच दिलीप कडु, , विनायक फुटाणे, बाबाराव मानकर, बंडु उताने, रविभाऊ शेंबडे, दिलीप बांगरे, नितीन फुटाणे, राजू देठे, उपसरपंच शैलेश बेलेकर, विनायक कोरडे, उत्तमराव कोरडे, महेश कोरडे, केशव खंडाळकर, राजु उदार, किरण शेजुळ, प्रशांत पिपराडे, रसुलभाई, शेख गफ्फार शेख सत्तार, नागेश देठे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे विजयी उमेदवारांनी सांगितले
