रोडवर चारचाकी वाहन उभी असल्याच्या वादावरून उपसरपंचास केली मारहाण

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथील ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रफुल्ल पवार वय ४९ वर्ष हे दिं ११ जून रोजी शेतातून बैलबंडी घेऊन घराकडे येत असताना येथील किसन इटाळे वय ४८ वर्ष यांच्या घरासमोर चारचाकी वाहन उभे असल्यामुळे बैलबंडी जात नसल्याने पवार यांनी वाहने बाजूला करण्यास सांगितले या कारणावरून प्रफुल पवार व किसन इटाळे यांच्या शाब्दिक वादावाद होवून किसन इटाळे व यांनी प्रफुल पवार यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना दिं ११ जून ला सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.
आंजी येथील प्रफुल पवार हे उपसरपंच असल्याने इटाळे यांच्या घरासमोर रोडच्या बाजूला चारचाकी वाहने उभी असल्याने प्रफुल पवार हे रोडच्या बाजूला वाहने उभी ठेवण्यास किसना इटाळे यांना सांगण्याकरीता गेले असता पवार यांना लाकडी दांड्याने मारहाण केली याबाबत प्रफुल पवार यांनी राळेगांव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पुढील तपास राळेगांव करीत आहे.