
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ राळेगाव तालुक्यातील ग्रा.वि.का.संस्था सावनेर येथे सोसायटिची निवडणूक पार पडली यात बाजार समितीचे सभापती अॅड प्रफुल्ल मानकर गटाचे तेरा सदस्य बिनविरोध निवडून आले यात आज दिनांक सतरा रोजी अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली यावेळी सोसायटी निवडणूक अधिकारी खरतडे यांच्या समक्ष अध्यक्ष पदी चंन्द्रहास्य झाडे तसेच उपाध्यक्ष पदी प्रताप मानकर यांची निवड करण्यात आली तसेच संचालक पदि प्रफुल्ल मानकर शांता दुधकोहळे,उत्तम जामुनकर,लिला गिरी,बाबा निशाने,मारोती धनविज,अभिजीत मानकर, गजानन सिडाम,रुख्मा मेश्राम, अंकुश जुमडे,गुजाब मुंगसे हि निवड ग्रामपंचायत सावनेर येथे पार पाडली यावेळी माजी सरपंच उमेश राऊत तसेच विशाल मासूरकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करन्यात आले यावेळी सोसायटी चे सचिव धर्मपाल धनवीज तसेच गावकरी उपस्थित होते.
